Sunday, August 28, 2011

दुर्दैवी पण सत्य!!! :(

मी दुपारी साडे चार ला घरी पहोचालो, पटकन आवरून खायला म्हणून जवळच्याच एका हॉटेल वर गेलो. वाद पाव संपवून मी चहा घेतला, इतक्यात तिथे एक साधारण ५०-५५ वर्षाची १ बाई आल्या.
डोक्यावरच जालानच भाल मोठे ओझ तिने बाजूला टाकले.कुठे तरी १ काळा केस, कपाळावर कुंकवाची मोठी छटा, घामामुळे कुंकवाचा लाल रंग भुवई वर आलेला, धारदार नाक, तंबाखू च्या मिसारीने घासून कालावांडलेले दात, सुरकुतलेले हात, ३-४ ठिकाणी हातानीच ठिगळे दिलेले लुगडे आणि चोळी असा वेश होता त्यांचा.
त्या आत आल्या, थरथरत्या हाताने त्यांनी गतागता पाण्याचे २ ग्लास पोटात रिचवले आणि हॉटेल मधल्या पोरीला विचारले, ""फक्त कालवण मिळेल का ग बाय? माझ्या कडे भाकरी हाये.
तिचा होकार मिळताच, कळपात फडक्यातून त्यांनी शिळी भाकरी काढली. एकाच क्षणात त्या अधाशी पणे त्यांनी ती खायला सुरवात केली.
मी विचार करायला लागलो, आपण त्यांना पैसे द्यावे का थोडे? ह्यांचे कोणीच नसेल का? आणि असेल तर ह्यांच्यावर अशी वेळ कशामुळे आली असेल?
त्यांची भाकरी संपण्याआधीच हॉटेल मधली पोरगी म्हणाली, "आजी मिसळ पाव घ्या, पैसे नाही घेणार मी तुमच्या कडून."
"पोरी आज खाईन इथे पोट भरून पण उद्या??" - आजी
"तुम्हाला मुल बाल नाही का?" - मुलगी
त्यावर आजी म्हणाल्या,
तसं न्हाय काय बी, पोरगा मोठा साहेब हाय,
परदेशाला मोठा इंगीनीर हाय, पण त्याला येलच नाय!!

कानाखाली चपराक बसावी आणि त्याचा आवाज मेंदू पर्यंत घुमावा तसे ते शब्द कानावर पडले आणि मना मध्ये विचारांचे काहूर माजले.

माणूस इतका खरच बदलोय का? आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या मुलीची जरा पण आठवण त्याला येत नसेल का? आणि जर येत असेल तर हि जबाबदारी त्याने अशी का झटकावी?
सगळेच अनुत्तरीत होते. माझा चेहरा खाली घालून मी हा विचार करीत होतो, इतक्यात पाठीवर तोच हात थरथरला, मी वर पहिले,
तर त्याच आजी म्हणाल्या, " इतका इचार नको करूस बाळा, तुझ्या आई बापाला नीट जप म्हणजे झाल."
मग तर अजून मेल्यागात झाल. आता फक्त रडयाचेच बाकी होते, कशांत माझ्या मनातले सगळे विचार त्या माउलीने जाणले होते, पण आम्हाला आमच्या आई वाधीलांचे थोडेसे दुख सुधा कधीच जनता येत नाही का?
जीवनाच्या साचोटीत इतके शिक्षण घेऊन सुद्धा आम्ही अडाणीच वाटतो ह्यांच्या समोर, ह्यांनी कुठे आणि कुठले शिक्षण घेतले असेल???
सेटलमेंट, न्यू जॉब, प्रमोशोन ह्यांच्या घोळत आम्ही हि आमची माणसे कुठे हरवून बसत आहोत हे आमचे आम्हाला पण काळात नाहीये.
डोक जड झाल, मी चालू लागलो.
शेजारी जिल्हा परिषदेच्या शाळेत मास्तर मुलांना विचारात होते, "आज आपण काय शिकलो?"
मी मनात म्हणालो, "इंजिनियर नाही होता आले तरी चालेल, पण एक चांगला आणि जबाबदार माणूस बनायचेच."

2 comments:

Mugdha said...

best................so touching.........

Vishal Talavanekar said...

शब्दातीत झालोय.....