आता बघा ना! तुमची स्वप्न, माझी स्वप्न, सगळ्यांचीच स्वप्न ही मोठीच असतात?
लहानपणी आजीने सांगितले होते कि, गरज ही शोधांची जननी आहे म्हणून!! पण आजकाल शोध आधी लागतात आणि मग त्या गरजा होतात.
गेल्या २० वर्षात TV, Mobile, Cable, इंटरनेट, social sites ह्या गोष्टींचा शोध लागला आणि आज त्या गरजा होऊन राहिल्या आहेत लोकांच्या. बर आता गरजा बदलल्या म्हणून स्वप्न बदलली का? तर नाही, उलट ती अजून मोठी होत गेली.
ज्याच्या कडे नोकिया आहे त्याला Android हवाय, Android वाल्याला I-phone हवाय. २ BHK ला ३ BHK हवाय आणि ३ BHK ला बंगला हवाय. २५००० कमी पडतात म्हणून ३५००० ची नोकरी हवी आहे, ३५००० वाल्याला ५०००० वाली हवी आहे. ५०००० वाल्याला $ मध्ये कमवायचे आहे.
पुण्या सारख्या शहरात घर विकत घेणे हे सामन्याचे फक्त स्वप्न राहिले आहे पण मग हाच सामान्य माणूस त्याच्या ऐवजी भारीतले mobile, गाडी, उंची कपडे (कपडे ते पण किती...अबब!!!) अश्या गोष्टी विकत घेत सुटत आहे. आणि शेवटी किती पण झाले तरी मिळणारे पैसे हे कमीच पडणार आहेत तुम्हाला, हेच माणसाला कळेनासे झाले आहे. (अर्थात, मी स्वतः देखील ह्याला अपवाद नाहीये!! :( ) समाधान ही गोष्ट आता उरलीच नाहीये समाजात असेच वाटू लागले आहे आणि चुकून एखादा समाधानी दिसला तर त्याला गावठी (मागास ला नवीन मराठी शब्द) म्हणायचे.
आपल्या समाजाचा एक खूप मोठा भाग हा वैचारिक दृष्ट्या मागास आहे (कारण काही असतील अगदी कमी शिक्षण ते बेकारी) पण वैचारिक दृष्ट्या सुशिक्षित असलेला समाज तरी कुठे काय मोठे दिवे लावत आहे? News tv channels असोत व news papers ते जे छापायला हवे ते छापतच नाहीयेत (किंवा इच्छा होऊन पण छापू शकत नाहीयेत.)
बर आणि स्वप्न मोठी फक्त शहराताल्यांचीच होत आहेत का, तर तिथे पण नकारच आहे.
भारत आता कृषिप्रधान देश आहे पण ते फक्य भूगोलाच्या पुस्तकात. आज काल च्या तरुणांना (ज्यांच्या घरी शेती आहे त्यांना) शेती करायची लाज वाटते का तर शहर आकर्षित करत आहे त्यांना.
पुण्या सारख्या शहरात अक्षरक्ष्याः शेकडो MBA आणि Engineering colleges आहेत आणि त्यात बहुतांश colleges ही गेल्या काही वर्षात निघालेली आहेत पण ह्याच काळात आपल्या कृषिप्रधान देशात किती नवीन agriculture college निघाली???
आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम माणूस हा स्वतः वर करून घेत आहे.
"माणूस हा सामाजिक प्राणी आहे" ते फक्त आता इतिहासात. आज काल माणूस हा फक्त आणि फक्त self centered बनत चालला आहे. मी, माझी बायको, माझी मुले (आणि अजून तरी) माझे आई-बाबा...मग बाकीचे जग, काही का होईना त्याचे. अरे पण तुमची मुले मोठी झाली कि ह्याच समाजात जगणारेत ना?? काय मागे ठेवून जात आहात येणाऱ्या पिढीला ह्याचा तर विचार करा. आजी आजोबा म्हणायच्या आधी आज काल मुल V आणि M TV बघायला शिकत आहेत आणि मग होणारच ना मुन्नी बदनाम!!! शहरात वृद्धाश्रम हे वाढतच जात आहेत आणि जास्त वाईट म्हणजे त्याचे समाजाला काहीच वाटत नाहीये.
पूर्वी आई वडिलांची स्वप्न असायची कि मुलगा/मुलगी शिकेल मोठा होऊन engineer होईल अमेरिकाला जाईल...आज आई वडिलांना स्वप्न असते कि अमेरिकेला गेलेला मुलगा आपल्याला भेटायला परत भारतात कधी तरी का होईना पण येईल!!!
आता ह्या सगळ्याला तुम्ही राजकारण्याचा दोष म्हणणार असला तर ते पण काही योग्य नाही ना!! आणि जरी त्यांचा दोष असेल काही अंशी तरी त्यांना आपणाच निवडले ना?
शेवटी कुठे तरी हे थांबवायला पाहिजे आणि ते आपण नाही थांबवले तर शेजारचा येवून थांबवेल अशी अपेक्षा करणे देखील चुकीचेच आहे ना??
लिहियाचे ठरवले तर लिहायला खूप विषय आहेत आणि विचार पण. पण, शेवटी मी पण ह्याच कलियुगातला ना, घड्याळाचे बंधन मला पण खुणावत आहे. सहज वाटले म्हणून लिहिले आज हे सगळे, स्वतः मध्ये काही तरी छोटीशी का होईना पण सुधारणा करायचा प्रयत्न करत आहे मी. हे वाचून तुम्हाला पण काही करावेसे वाटले तर मला आनंदच आहे.
- सुयश जोशी.
दसरा २०१२
No comments:
Post a Comment