Saturday, November 16, 2013

सचिन...सचिन!!!

गेले काही दिवस सच्या रिटायर होणार म्हणून प्रचंड चर्चा चालू होत्या, तरी खर सांगायचे तर अनेक जण गप्प होते. आज खरया अर्थाने मला लहानपणी क्रिकेट का इतके आवडायचे कळले. अर्थात हा माणूस... आणि हा माणुस वेगळाच रे. इतिहासातल्या अनेक तारखा मराठी माणसाच्या मनात घर करुन बसल्या आहेत त्यात आजची तारीख पण समाविष्ट झाली तर नवल वाटू नये.

लहानपणी सुट्टीच्या दिवशी, मॅच चालू असताना सचिन आउट झाला कि, सगळी पोरे घराबाहेर क्रिकेट खेळायला पडायची. ह्याचा अर्थ असा अजिबात नसायचा कि बाकी कोणी भारी खेळायचे नाही पण त्याच्या खेळातली जादु वेगळी होती. आई आणि शाळेतल्या बाई ह्यांची बोलणी खाण्या मागे अनेकदा हा माणुस कारणीभूत होता. कित्येकदा लहानपणी स्कोर काय झाला हे न विचारता सचिन किती वर खेळत आहे रे हेच विचारले जायचे.

एक काळ खरच असा होता कि सचिन म्हणजेच इंडियन क्रिकेट होते. मी क्रिकेट फॅन होण्यात सचिन चा वाटा फार मोठा आहे. गेल्या काही वर्षात अचानक एक सचिन हेटर्स ची एक मोठी फौज तयार झाली. पण मी स्वतः अश्या खुप कमी सचिन fans ना भेटलो जे बाकीच्या प्लेयर्स चे हेटर्स होते. मला स्वतःला गांगुली, द्रविड़, कुंबळे, लक्ष्मण हे तितकेच आवडले जितके लहानपणी शास्त्री, प्रभाकर, अजहर अणि जडेजा आवडायचे. आणि आज जो मान सचिन ला मिळत आहे ना तो मान गांगुली, द्रविड़, कुंबळे, लक्ष्मण ह्यांना पण  मिळायला हवा होता (कदाचित इतका नसता मिळाला पण  they deserve it as well.) आणि honestly thank god मिळाला नाही, कारण माझ्या सारखे अनेक क्रिकेट आणि सचिन fans त्या वेळी पण इमोशनल झाले असते. अजुन पण  मला वाटते कि द्रविड़ वेळे आधीच रिटायर झाला टेस्ट मधून.

पण मग मी हे आज का सगळे लिहित आहे??? दोन  कारण आहेत -
१. आज सचिन रिटायर होतोय.
२. त्या सोबत माझे लहानपणी चे सगळे आवडते प्लेयर्स रिटायर होत आहेत.

माझ्या आयुष्यात फारसे काही कळायचे नाही त्या वेळी फक्त खेळायचे कळायचे. आणि क्रिकेट हा अर्थात आवडता खेळ. गावसकर, कपिल, शास्त्री हे जरा माझ्या जास्त लहानपणीचे पण अर्थात लहानपणी त्यांचा पैन अभिमान होता. पण  मी लहानाचा मोठा झालो तो मात्र सचिन सोबत. कुंबळे, श्रीनाथ, प्रसाद हाच काय तो बोलिंग attack. अज़हर, प्रभाकर, जडेजा, रॉबिन सिंघ, सिध्धू, कांबळी, मोंगिया होतेच पण  चर्चा असायची ती सचिनचीच. नंतर द्रविड़, गांगुली, लक्ष्मण आणि सेहवाग आले, खरया अर्थाने बर्डन शेयर झाले.


सचिन चा स्ट्रैट ड्राइव, कवर ड्राइव, paddle स्वीप, uppar कट, बैकफूट चा पंच, Caddick ला मारलेली पूल ची छकड़ी, मनगटातले कडे हलवत टाकलेली बोलिंग, त्याचा तो स्टांस, हेल्मेट घातलेली मान वर खाली हलवत फास्ट बॉलर कडे बघायची स्टाइल, Warne ला स्टेप आउट करून लावलेल्या सिक्स्, One day मधले पहिले द्विशतक, मोईन खान च्या दिवसातल्या लास्ट बॉल वर काढलेला बोल्ड, आधी गांगुली आणि नंतर सेहवाग सोबत केलेल्या शतकी भागीदारया, प्रत्येक शतका नंतर हेल्मेट काढून आकाशाकडे बघायची सवय....... मी अजुन १५-२० लाइन्स तरी अश्याच लिहित राहु शकीन पण सगळे काही संपणार नाही. तेंडल्या च्या memories ह्या अश्याच आठवत राहतील. माणुस म्हणून हा जितका साधा आहे/राहतो त्यातच त्याचे मोठेपण दिसते. द्रविड हा एकमेव प्लेयर त्याच्या ह्या बाजुला तोडिस तोड म्हणता येईल. दादा ची आगली वेगळी style जशी त्यालाच शोभते,तसेच द्रविड़ अणि सचिन चा साधेपणाच त्यांना महान बनवतो. सचिन हा किती डाउन तो अर्थ आहे हे त्याने जाता जाता खेळपट्टी ला केलेल्या नमस्कारा वरून सहज लक्ष्यात  येते.

आज सचिन सोबत माझ्या लहानपणीचे सगळे आवडते प्लेयर्स रिटायर झाले आहेत. समाधान इतकेच कि जे राहुल, सौरव अणि लक्ष्मण ला मिळाला नाही तो वर्ल्ड कप सचिन ला तरी मिळाला. सचिन fortunate म्हणावा का deserving म्हणावा? तो त्याची प्रत्येक क्रिकेट फॉरमॅट मधली शेवटची मॅच जिंकला. पहिली अणि शेवटची इंटरनॅशनल T20 जिंकला, रणजी जिंकला, IPL जिंकला, C'league जिंकला, वन डे जिंकला अणि आज टेस्ट पण जिंकला. सचिन च्या रेकॉर्ड बद्दल मी इथे काहीच बोलणार नाहीये कारण किती बोललं तरी ते कमीच वाटत राहत. नंतर आलेले धोनी, UV, कोहली, रैना अर्थात खुप चांगले आहेत पण त्यांच्यात तेंडल्या ची ती मजा नाही. कदाचित कोहली सचिन चे काही विक्रम मोडेल पण, पण त्याचा करिष्मा मला तितका भावणार नाही.

आता खरया अर्थाने क्रिकेट हा सांघिक खेळ झालाय म्हणायला हरकत नाही...

                                                                                                                                           सुयश दि. जोशी.
                                                                                                                                     १६, नोवेम्बर २०१३. 

Wednesday, October 24, 2012

काल बदलला, माणूस बदलला पण बदलत नाहीयेत स्वप्न आणि त्यांच्या मागे धावणे.

स्वप्न हे कायम मोठेच का असते?

आता बघा ना! तुमची स्वप्न, माझी स्वप्न, सगळ्यांचीच स्वप्न ही मोठीच असतात?
लहानपणी आजीने सांगितले होते कि, गरज ही शोधांची जननी आहे म्हणून!! पण आजकाल शोध आधी लागतात आणि मग त्या गरजा होतात.

गेल्या २० वर्षात TV, Mobile, Cable, इंटरनेट, social sites ह्या गोष्टींचा शोध लागला आणि आज त्या गरजा होऊन राहिल्या आहेत लोकांच्या. बर आता गरजा बदलल्या म्हणून स्वप्न बदलली का? तर नाही, उलट ती अजून मोठी होत गेली.

ज्याच्या कडे नोकिया आहे त्याला Android हवाय, Android वाल्याला I-phone हवाय. BHK ला BHK हवाय आणि BHK ला बंगला हवाय. २५००० कमी पडतात म्हणून ३५००० ची नोकरी हवी आहे, ३५००० वाल्याला ५०००० वाली हवी आहे. ५०००० वाल्याला $ मध्ये कमवायचे आहे.
पुण्या सारख्या शहरात घर विकत घेणे हे सामन्याचे फक्त स्वप्न राहिले आहे पण मग हाच सामान्य माणूस त्याच्या ऐवजी भारीतले mobile, गाडी, उंची कपडे (कपडे ते पण किती...अबब!!!) अश्या गोष्टी विकत घेत सुटत आहे. आणि शेवटी किती पण झाले तरी मिळणारे पैसे हे कमीच पडणार आहेत तुम्हाला, हेच माणसाला कळेनासे झाले आहे. (अर्थात, मी स्वतः देखील ह्याला अपवाद नाहीये!! :( ) समाधान ही गोष्ट आता उरलीच नाहीये समाजात असेच वाटू लागले आहे आणि चुकून एखादा समाधानी दिसला तर त्याला गावठी (मागास ला नवीन मराठी शब्द) म्हणायचे.

आपल्या समाजाचा एक खूप मोठा भाग हा वैचारिक दृष्ट्या मागास आहे (कारण काही असतील अगदी कमी शिक्षण ते बेकारी) पण वैचारिक दृष्ट्या सुशिक्षित असलेला समाज तरी कुठे काय मोठे दिवे लावत आहे? News tv channels असोत news papers ते जे छापायला हवे ते छापतच नाहीयेत (किंवा इच्छा होऊन पण छापू शकत नाहीयेत.)

बर आणि स्वप्न मोठी फक्त शहराताल्यांचीच होत आहेत का, तर तिथे पण नकारच आहे.
भारत आता कृषिप्रधान देश आहे पण ते फक्य भूगोलाच्या पुस्तकात. आज काल च्या तरुणांना (ज्यांच्या घरी शेती आहे त्यांना) शेती करायची लाज वाटते का तर शहर आकर्षित करत आहे त्यांना.
पुण्या सारख्या शहरात अक्षरक्ष्याः शेकडो MBA आणि Engineering colleges आहेत आणि त्यात बहुतांश colleges ही गेल्या काही वर्षात निघालेली आहेत पण ह्याच काळात आपल्या कृषिप्रधान देशात किती नवीन agriculture college निघाली???

आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम माणूस हा स्वतः वर करून घेत आहे.
"माणूस हा सामाजिक प्राणी आहे" ते फक्त आता इतिहासात. आज काल माणूस हा फक्त आणि फक्त self centered बनत चालला आहे. मी, माझी बायको, माझी मुले (आणि अजून तरी) माझे आई-बाबा...मग बाकीचे जग, काही का होईना त्याचे. अरे पण तुमची मुले मोठी झाली कि ह्याच समाजात जगणारेत ना?? काय मागे ठेवून जात आहात येणाऱ्या पिढीला ह्याचा तर विचार करा. आजी आजोबा म्हणायच्या आधी आज काल मुल V आणि M TV बघायला शिकत आहेत आणि मग होणारच ना मुन्नी बदनाम!!! शहरात वृद्धाश्रम हे वाढतच जात आहेत आणि जास्त वाईट म्हणजे त्याचे समाजाला काहीच वाटत नाहीये.

पूर्वी आई वडिलांची स्वप्न असायची कि मुलगा/मुलगी शिकेल मोठा होऊन engineer होईल अमेरिकाला जाईल...आज आई वडिलांना स्वप्न असते कि अमेरिकेला गेलेला मुलगा आपल्याला भेटायला परत भारतात कधी तरी का होईना पण येईल!!!
आता ह्या सगळ्याला तुम्ही राजकारण्याचा दोष म्हणणार असला तर ते पण काही योग्य नाही ना!! आणि जरी त्यांचा दोष असेल काही अंशी तरी त्यांना आपणाच निवडले ना?
शेवटी कुठे तरी हे थांबवायला पाहिजे आणि ते आपण नाही थांबवले तर शेजारचा येवून थांबवेल अशी अपेक्षा करणे देखील चुकीचेच आहे ना??

लिहियाचे ठरवले तर लिहायला खूप विषय आहेत आणि विचार पण. पण, शेवटी मी पण ह्याच कलियुगातला ना, घड्याळाचे बंधन मला पण खुणावत आहे. सहज वाटले म्हणून लिहिले आज हे सगळे, स्वतः मध्ये काही तरी छोटीशी का होईना पण सुधारणा करायचा प्रयत्न करत आहे मी. हे वाचून तुम्हाला पण काही करावेसे वाटले तर मला आनंदच आहे.

- सुयश जोशी.
दसरा २०१२